विश्वनाथन आनंद...
जगज्जेता ‘विश्व’नाथ आनंद.....!!!
जन्म:- डिसेंबर ११, १९६९ – हयात...
भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर व सध्याचा जगज्जेता असलेला बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद... चौसष्ट घरांचा अनभिषिक्त राजा भारताचा विश्वनाथन आनंद पाचव्यांदा जागतिक ... बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता ठरला आहे... बुद्धिबळात विश्वअनाथन आनंदची ओळख कायम वेगवान चालींसाठी प्रसिद्ध असलेला बुद्धिबळपटू अशीच आहे... जबरदस्त वेगाने आक्रमक चाली करीत आनंद बाजी मारत असल्यामुळे अनेक बुद्धिबळ तज्ज्ञ त्याचे चाहते आहेत...
भारतामधील बुद्धिबळाच्या शककर्ता म्हणून ओळखला जाणाऱ्या विश्वनाथन आनंद याने बुद्धिबळाच्या माहेरघरी इस्त्रायलचा आव्हानवीर बोरिस गेलफंड याच्यावर मात करत पाचव्यांदा जगज्जेता होण्याचा मान मिळवला आहे...मास्को हे शहर बुद्धिबळातील मक्का मानले जाते आणि याच शहरात विश्वविजेतेपद मिळवत विश्वनाथ आनंद याने भारताचा झेंडा फडकविला आहे..
अतिशय शांत, संयमी आणि हसतमुख व्यक्तीमत्वाच्या आनंदने मानसिक संतुलन राखत संयम व चिकाटी यांचा सुरेख समन्वय साधल्यास विजेतेपद मिळविता येते हे दाखवून दिले आहे.. आणि तो एक महान खिलाडू आहे हे परत एकदा सिद्ध केलय...
विश्वनाथन आनंदने १९९८ मध्ये भारताचे पहिले ग्रैंडमास्टर बनण्याचा मन मिळवला आणि २००० मध्ये स्पेनच्या अलेक्सी शिरोवला मात देवून फिडेचे (FIDE फेडरेशन इंटरनॅशनल डेस इचेसच्या) जगज्जेतेपद जिंकणारे पहिले भारतीय बनले.... सप्टेंबर २००७ साली मेक्सिको शहरात झालेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत एकाही सामना न हरता, इतर स्पर्धकांपेक्षा एक पूर्ण गुण अधिक मिळवून जगज्जेता पद मिळविले... २००८ मध्ये आनंदने रशियाच्या व्लादिमिर क्रॅमनिकला तर २०१० मध्ये आनंदने बुल्गेरियाच्या तोपालोवला बुल्गेरियामध्ये हरवुन जगज्जेतेपद आपल्यापाशीच ठेवले....
एप्रिल २००७ मध्ये त्याने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली... हे स्थान त्याने १५ महिने टिकवले... मात्र जुलै २००८ मध्ये त्याला पहिल्या तीन क्रमांकामध्ये स्थान राखण्यात अपयश आले... त्यानंतर २०१० मध्ये त्याने बिलाबाओ मास्टर्स स्पर्धेत जगातील अव्वल मानांकित खेळाडू कार्लसन याला पराभूत करून पुन्हा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान घेतले.. २००८ च्या सामन्यानंतर आनंदने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या तीन वेगवेगळ्या प्रकारात म्हणजे आव्हानवीर सामना, जलदगती पद्धत व बाद फेरीची स्पर्धा अशा तिन्ही स्वरुपात पहिला जगज्जेता होण्याचा मान मिळविले आहे.... आतापर्यंत तब्बल ६ ऑस्कर जिंकलेला विश्वनाथन आनंद आज बुद्धिबळातील निर्विवाद बादशाह बनला आहे...
विश्वनाथन आनंदला आजवर मिळालेले पुरस्कार :-
भारत सरकारचा खेळ पुरस्कार - अर्जुन पुरस्कार (१९८५)
भारत सरकार 'पद्मश्री' (१९८७),
भारत सरकार 'पद्मभूषण' (२०००) व 'पद्मविभूषण' (२००७)
भारत सरकारचा सर्वोच्च खेळ पुरस्कार - 'राजीव गांधी खेळ रत्न' (१९९१-१९९२)
हा पुरस्कार मिळणारा विश्वनाथन आनंद हा पहिला खेळाडू आहे.
स्पेन सरकारचा सर्वोच्च पुरस्कार - Jameo de Oro (२५ एप्रिल २००१).
चेस ऑस्कर - सहा वेळा (१९९७, १९९८, २००३, २००४, २००७, २००८ आणि २००९).
आनंदने कास्पारॉव्ह, टोपालोव्ह, कार्लसन या वेगवेगळ्या पिढय़ांतील विजेत्यांवर विजय मिळवून खर्या८ अर्थाने अनभिषिक्त सम्राट झाला आहे... कारण त्याने 50 च्या सुमारास जन्मलेल्या पिढीपासून 60, 70, 80 पर्यंतच्या सर्वांवर मात केली आहे...तेव्हा आनंद तीन पिढय़ांचा चॅम्पियन आहे म्हटलं तरी चालेल.. कास्पारॉव्ह विश्वविजेता होता, परंतु तोही आपले साम्राज्य टिकवताना घाबरायचा.. विश्वविजेता असतानाही तो खेळला नाही... चाळिशीनंतर आनंदचाही खेळ खराब होईल असे त्याने भाकीत केले होते, परंतु चाळीशी ओलांडूनही आनंद चॅम्पियन होत आहे... या आधीही आनंद जगज्जेता होता पण एकदा मिळवलेले विजेतेपद टिकविण्यासाठी अधिक श्रम करावे लागतात, तेच आनंदने केले... पाचव्यांदा बुद्धिबळाचे विश्वविजेतेपद पटकावून त्याने तमाम भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे...
खर्याे अर्थाने बुद्धिबळाचा सम्राट असणाऱ्या या जगज्जेत्याला सलाम आणि त्याच्या या अतुलनीय यशासाठी हार्दिक हार्दिक अभिनंदन !!!!

No comments:
Post a Comment